शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या संपन्न करण्यासाठी कंपनीचा उपक्रम
लांजा ( प्रतिनिधी) लांजा तालुका कॅश्यु फार्मर्स प्रोडूसर कंपनीतच्या वतीने तालुक्याच्या विविध गावातील शेतकऱ्यांना नुकतेच १२ हजार काजू कलमांचे वाटप करण्यात आले.
काजू पिकाच्या माध्यमातून लांजा तालुक्यातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या संपन्न करण्यासाठी लांजा तालुका कॅश्यु फार्मर्स प्रोड्युसर कंपनी प्रयत्नशील आहे याच अनुषंगाने ५ ऑगस्ट रोजी तालुक्यातील रावारी, बापेरे,गोळवशी, खावडी कोंडये, निओशी, इंदवटी, लांजा, ईसवली,निवसर, भांबेड,विवली, कोट, कोलधे या गावातील शेतकऱ्यांना १२ हजार काजू कलमांचे वाटप करण्यात आले. म्हणजेच कंपनीतर्फे यावर्षी आतापर्यंत २६
हजार काजू कलम वाटप करण्यात आले
कंपनीच्या माध्यमातून चेअरमन आनंद कांबळे, काजू प्रोजेक्ट प्रमुख संचालक गणेश खानविलकर हे मोफत झाडे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्या बद्दल परिसरातून शेतकऱ्यांना कंपनी मार्फत दिलास मिळत आहे











