दोडामार्ग भाजपा वतीने सत्कार
दोडामार्ग / प्रतिनिधी:
भारतीय जनता पक्षाच्या विचारसरणीशी निष्ठा राखून सामाजिक व राजकीय क्षेत्रात सातत्याने कार्यरत असणाऱ्या स्थानिक कार्यकर्त्यावर पक्षाने महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. भारतीय जनता युवा मोर्चाच्या (BJYM) जिल्हा उपाध्यक्षपदी देवेंद्र शेटकर यांची नुकतीच निवड करण्यात आली असून, या नव्या जबाबदारीमुळे युवा संघटन अधिक मजबूत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला जात आहे. त्याचा नुकताच भाजपा दोडामार्ग तालुका कार्यालयात तालुका अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य दिपक गवस जेष्ठ पदाधिकारी रंगनाथ गवस, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष पराशर सावंत आदी सह पदाधिकारी उपस्थित होते
नवनियुक्त जिल्हा उपाध्यक्षांनी सांगितले की, “पक्षाने माझ्यावर अत्यंत मोलाचा विश्वास दाखवून ही जबाबदारी सोपवली आहे. पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवणे, तरुणांना संघटित करणे आणि जनतेच्या प्रश्नांसाठी प्रामाणिकपणे कार्य करणे हेच माझे मुख्य उद्दिष्ट राहील.”असे स्पष्ट केले
या निवडीबद्दल त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचे मनापासून आभार मानले आहेत. यामध्ये प्रामुख्याने:
श्री. रवींद्र चव्हाण (भाजपा प्रदेशाध्यक्ष) खासदार नारायणराव राणे साहेब ना. नितेशजी राणे (पालकमंत्री)श्री. प्रभाकर सावंत (भाजपा जिल्हा अध्यक्ष)
श्री. संदीप मेस्त्री (युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष)श्री. दीपक गवस (दोडामार्ग मंडळ अध्यक्ष)
श्री. चेतन चव्हाण (दोडामार्ग नगराध्यक्ष)तसेच पक्षातील सर्व ज्येष्ठ नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
युवा संघटनेला नवे बळ
या निवडीमुळे दोडामार्ग परिसर तसेच संपूर्ण जिल्ह्यात भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्याला नवी ऊर्जा मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. निवडीचे वृत्त समजताच विविध स्तरातून व पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
दोडामार्ग तालुका कार्यालयात देवेद शेटकर याचा सत्कार करण्यात आला यावेळी दिपक गवस, रंगनाथ गवस आदी उपस्थित होते
छाया सुहास देसाई












