चिपळूण (प्रतिनिधी) : श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चिपळूण या संस्थेच्या तेविसावी शाखा पाग चिपळूणचे उद्घाटन संस्थापक अध्यक्ष प्रभाकर आरेकर यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत झाला यावेळी संस्थेचे सभासद प्रकाश आंबुर्ले, सोपान पाटील, सौ. वैष्णवी मुननकर, नंदकुमार तांबे यांनी मनोगत व्यक्त करताना संस्थेच्या कार्यपद्धतीचे व तत्पर सेवेचे कौतुक करून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर आरेकर व संचालक मंडळ तसेच कर्मचारी यांचे विशेष आभार मानले.
यावेळी संस्थापक अध्यक्ष प्रभाकर आरेकर यांनी मनोगत व्यक्त करताना संस्थेचे आर्थिक स्थितीचे सविस्तर विवेचन करून संस्थेची माहिती दिली. यावेळी बोलताना संस्थेचे रोप्य महोत्सवी वर्ष सुरु झाले असून त्यानिमित्ताने संस्थेच्या पंचवीस शाखा या वर्षांमध्ये सुरू करण्याचा मानस असून त्या दृष्टीने संस्था प्रयत्नशील असल्याचे सांगितले. संस्थेच्या या यशामध्ये रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील सर्व आजी-माजी अधिकारी कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले असून संस्थेने केलेल्या प्रगतीमध्ये सभासद, ठेवीदार, कर्जदार तसेच हितचिंतक यांचे मोलाचे योगदान असल्याचे नमूद केले. कोणत्याही संस्थेचे मूल्यमापन करून सभासद, ठेवीदार, ग्राहक यांनी दिलेली पोचपावती कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठी असते असे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले व सर्व उपस्थितांचे सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. या उद्घाटन सोहळ्याचे निमित्ताने गुहागरचे आमदार भास्कर जाधव, सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम आणि वशिष्ठी मिल्क अँड मिल्कप्रोडक्टचे प्रशांत यादव, चिपळूण पंचायत समितीचे सभापती सूर्यकांत खेतले, चिपळूण अर्बन बँकेचे अध्यक्ष मोहन मिरगल व त्यांचे सहकारी, मराठा नागरी सहकारी पतसंस्थेचे दत्ताराम सुर्वे, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी-आजी अधिकारी, चिपळूण नगर परिषदेचे नगरसेवक मिथिलेश नरळकर, उपमुख्याधिकारी प्रमोद ठसाळे, पाग परिसरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक यांनी उपस्थित राहून यावेळी संस्थेला शुभेच्छा दिल्या.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष हेमचंद्र हळदणकर, संचालक सर्व दिलीप मयेकर, सुहास भोसले, पराग आरेकर, अरुण पाटील, उदय वेल्हाळ, विजय जाधव संचालिका सौ स्मिता आरेकर, श्रीमती प्रज्ञा नरवणकर, सौ. रागिणी आरेकर तसेच संस्थेचे कर्मचारी वर्ग व अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार व्यवस्थापक श्री संदीप रहाटे यांनी मानले.













