चिपळूण (प्रतिनिधी): भारतीय जनता पार्टी प्रणित नवभारतीय शिव वाहतुक संघटना भाजपा ट्रान्सपोर्ट सेल महाराष्ट्र राज्य सेनेच्या वाहतुक सेलच्या कोकण विभाग प्रमुख प्रमुख संघटक (रायगड/रत्नागिरी/सिंधुदुर्ग) हा पदावरती नियुक्ती करण्यात आली. अध्यक्ष राज्य अल्पसंख्याक आयोग महाराष्ट्र राज्य तसेच भारतीय जनता पार्टी ट्रान्सपोर्ट सेलचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी संतोष नलावडे यांची कोकण विभाग प्रमुख संघटक (रायगड/रत्नागिरी /सिंधुदुर्ग) या पदावरती नियुक्ती करण्यात आली. असल्याचे पत्र प्रधान करताच कार्यकर्त्यामध्ये उत्साहाचे वातावरण पसरले असून कोकणातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
संतोष नलावडे यांनी राजकारणात शिवसेनेपासून सुरूवात केली असून, मनसे तालुका अध्यक्ष (चिपळूण) जिल्हा सचिव रत्नागिरी, जिल्हा अध्यक्ष रत्नागिरी अशी विविध पदावर काम करून जनतेला न्याय देण्यासाठी अहोराम मेहनत घेतली आहे. संतोष नलावडे यांच्या निवड पत्रात भाजप नेते हाजी अरफात शेख यांनी नुकतेच वहातूकदारांना खंबीर नोतृत्वाची गरज असून त्यांची विश्वासहर्ता जपणे ही अत्यंत महत्वपूर्ण बाब आहे. आपण सामाजिक बांधीलकीच्या जाणीवनेने सर्वसामान्य वाहतूकदार व जनतेला अभिप्रेत अस्णारी वहातूक संघटना उभारली पाहिजे. आपला कार्यकाळात वाहतूकदारांच्या न्याय हक्कासाठी सदैव लढण्याची तत्परता दाखवून सक्रिय रहावे. यासाठी त्यांना भाजपकडून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. निवडीबद्दल नलावडे पत्रकारांशी बोलताना सांगितले की, रिक्षा, टेम्पो, बस, ट्रक, ट्रेलर त्याचबरोबर या विभागामध्ये येणा-या सर्व वाहातूकदारांना योग्यप्रकारे न्याय देण्याचा प्रयत्न करणार तसेच संघटनेच्या माध्यमातून पक्ष वाढीसाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणार असून वहातूकदारांचे सर्व प्रश्न सोडवियासाठी अहोरात प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. संघटनेचे अध्यक्ष हाजी अ. शेख यांनी माझ्यावर दाखविलेला विश्वातसार्थ ठरविणार आहे. कोकणात प्रणित शिववाहतूक/ भाजपा ट्रान्सपोर्ट सेल वाढविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.












