भारत माता की जय, वंदे मातरम च्या घोषणांनी लांजा शहर परिसर दणाणला

हर हर तिरंगा उपक्रमांतर्गत लांजा पंचायत समिती कडून काढण्यात आली रॅली

संतोष कोत्रे
लांजा-: भारत माता की जय…..वंदे मातरम च्या घोषणांनी लांजा शहर परिसर दणाणून सोडण्यात आला. निमित्त होते ते हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत लांजा पंचायत समितीच्या वतीने आज बुधवारी सकाळी लांजा शहरातून काढण्यात आलेल्या
भव्य स्वरूपातील रॅली आणि बाईक रॅलीचे .
हर हर तिरंगा उपक्रमांतर्गत लांजा पंचायत समितीच्या वतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी सकाळी लांजा पंचायत समिती इथून या रॅलीला सुरुवात झाली. यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या. भारत माता की जय…..वंदे मातरम अशा जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडण्यात झाला. लांजा बाजारपेठेतून पुन्हा पंचायत समिती या ठिकाणी घेण्यात आली. यावेळी बाईक रॅली देखील काढण्यात आली होती.
या रॅलीमध्ये पंचायत समिती सभापती सौ मानसी आंबेकर, उपसभापती आदेश आंबोळकर, गटविकास अधिकारी हिंदुराव गिरी, पंचायत समिती सदस्य शैलेश खामकर, रसिका मेस्त्री, साक्षी चव्हाण, गटशिक्षणाधिकारी विनोद सावंग, लांजा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष सौ.सावली कुरूप, उपनगराध्यक्ष मिलिंद लांजेकर, नगरसेविका, नगरसेवक, लांजा हायस्कूलचे शिक्षक आणि विद्यार्थी, लांजा शाळा क्रमांक पाच चे विद्यार्थी आणि शिक्षक, पंचायत समिती शिक्षण विभागाचे कर्मचारी या रॅली मध्ये सहभागी झाले होते.