जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभाग घेण्याचे आवाहन
सावंतवाडी:
लेफ्टनंट कर्नल श्रीमंत शिवरामराजे भोंसले यांच्या जनशताब्दी वर्षाचे औचित्य साधून तसेच श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या संस्थापक दिनानिमित्त गुरुवार, दिनांक १३ ऑगस्ट रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी आणि ‘ऑन कॉल रक्तदाते’ संस्था, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडणार आहे.
सदरचे रक्तदान शिबिर सावंतवाडी येथील एस. पी. के. कॉलेजच्या जिमखाना हॉलमध्ये सकाळी ८.३० ते दुपारी १.०० या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. या सामाजिक उपक्रमात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
रक्तदानासाठी इच्छुकांनी एनसीसी आर्मी प्रमुख डॉ. सचिन देशमुख (७८७५५८२८५०), राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख डॉ. सुधीर बुवा (९४२२८१०२२६), ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे सदस्य मंगेश माणगावकर (७४९८६२१२३५), कार्यकारिणी सदस्य दिनेश गावडे (९४२०७४०४४४), सचिव बाबली गवंडे (८३९०९०५२६९) आणि खजिनदार सिद्धार्थ पराडकर (९४२२९६७२४९) यांच्याशी संपर्क साधावा. या शिबिरात सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य भारमल सर आणि ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे अध्यक्ष तथा सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षक श्री दयानंद गवस यांनी केले आहे.












