रत्नागिरी:
जागतिक युवा दिनाचे औचित्य साधून कौशल्य विकास केंद्र, रत्नागिरी यांच्या वतीने भव्य रोजगार मेळाव्याचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. रत्नागिरीतील तरुणांना रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या या मेळाव्यात एकूण ६६ उमेदवारांची निवड करण्यात आली असून, त्यापैकी १० गुणवंत उमेदवारांना तात्काळ म्हणजेच ‘ऑन द स्पॉट’ नोकरीची ऑफर प्रदान करण्यात आली.
या भव्य रोजगार मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शासकीय तंत्रनिकेतन (गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज), रत्नागिरीचे प्राचार्य डॉ. राजेंद्र डोईफोडे सर उपस्थित होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. डोईफोडे सर यांनी, “तंत्रशिक्षणाला कौशल्य विकासाची कशी भक्कम साथ मिळेल यासाठी सर्वांनी नेहमीच प्रयत्नशील राहिले पाहिजे,” असे महत्त्वपूर्ण विधान केले.
रत्नागिरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त स्थानिक उमेदवारांना नोकरी कशी मिळेल आणि जिल्ह्यातील बेरोजगारी कशी कमी करता येईल, यासाठी कौशल्य विकास केंद्र, रत्नागिरी हे नेहमीच प्रयत्नशील व कटिबद्ध असते. या मेळाव्याच्या यशस्वी आयोजनातून केंद्राने पुन्हा एकदा आपल्या या ध्येयाची प्रचिती दिली आहे.
हा भव्य कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल आणि तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल कौशल्य विकास केंद्र, रत्नागिरीचे प्राचार्य श्री. आदिश मेहता सर व त्यांच्या सर्व टीमचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. या उपक्रमामुळे रत्नागिरीतील युवा वर्गात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
Home महत्वाच्या बातम्या जागतिक युवा दिनानिमित्त कौशल्य विकास रत्नागिरीतर्फे भव्य रोजगार मेळावा; ६६ जणांची निवड,...












