दोडामार्ग:
कोनाळ कट्टा येथील प्रसिद्ध शासकीय ठेकेदार प्रभाकर ऊर्फ बाप्पा अनंत पोकळे (वय ८७) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या निधनामुळे एक उत्तम, अनुभवी व अभ्यासू शासकीय ठेकेदार गमावल्याची भावना राजकीय, सामाजिक आणि ठेकेदार क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे.
गेली दोन दशके त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय ठेकेदार व्यवसायात अत्यंत दर्जेदार व गुणवत्तेची कामे केली होती. विशेषतः दोडामार्ग तालुक्यात विविध शासकीय व विकासात्मक कामांना गती देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.
सामाजिक क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान राहिले असून, सर्वांशी सौजन्याने वागणे, शांत स्वभाव आणि मनमिळाऊ व्यक्तिमत्व यामुळे ते सर्वांना परिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित एक मुलगी, एक मुलगा, नातवंडे आणि जावई असा मोठा परिवार आहे. शासकीय ठेकेदार परेश पोकळे यांचे वडील, माणगाव येथील माजी जिल्हा परिषद सदस्य रमाकांत ताम्हाणेकर यांचे सासरे, तसेच सावंतवाडीतील सामाजिक कार्यकर्ते आबा केसरकर यांचे मामा होत.











