रत्नागिरी: प्रतिनिधी
भारत माता की जय”, “वंदे मातरम” आणि “एक राष्ट्र, एक संस्कृती”अशा घोषणा देत रत्नागिरीतील गाडीतळ येथील स्वातंत्र्य लक्ष्मी चौकातून अखंड भारत संकल्प दिना’निमित्त शहरात भव्य बाईक रॅली काढण्यात आली. हिंदू नेते ना. नितेश राणे यांनी या रॅलीचे नेतृत्व केले. भगव्या झेंड्यांनी वातावरणात उत्सव निर्माण झाला होता
सुरुवातीला ना. राणे यांनी स्वा. सावरकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर श्रीफळ वाढवून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आ. प्रमोद जठार, भाजपा दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, भाजपा नेते वैभव खेडेकर, ज्येष्ठ नेते बाबा परुळेकर, सचिन वहाळकर, एडव्ह विलास पाटणे, तसेच संघ परिवार सदस्य, भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व देशप्रेमी उपस्थित होते
‘सकल हिंदू समाज, रत्नागिरी’च्या वतीने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला रत्नागिरीकरांचा उत्स्फूर्त आणि भव्य प्रतिसाद लाभला.
शहरातील ‘स्वातंत्र्य लक्ष्मी चौक, गाडीतळ’ येथून भव्य बाईक रॅलीने झाली. या रॅलीमध्ये शेकडो तरुणांनी भगवे ध्वज हाती घेऊन सहभाग घेतला होता. देशप्रेमाच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
ही बाईक रॅली स्वातंत्र्य लक्ष्मी चौक (गाडीतळ) येथून निघून मारुती आळी, जयस्तंभ, मारुती मंदिर मार्गे सावरकर नाट्यगृह येथे पोहोचली. संपूर्ण मार्गावर नागरिकांनी रॅलीचे उत्साहात स्वागत केले.
रॅलीनंतर सावरकर नाट्यगृह येथे भव्य जाहीर मार्गदर्शन सभा पार पडली. या सभेला प्रमुख वक्ते म्हणून हिंदू नेते श्री. नितेश राणे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन ‘सकल हिंदू समाज, रत्नागिरी’ यांच्या वतीने करण्यात आले होते. या संपूर्ण कार्यक्रमाला शहरातील नागरिक, युवक आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.












