रत्नागिरी । प्रतिनिधी
भारत सरकारचे माजी केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, खासदार नारायणराव राणे यांनी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष कै. राजेश सावंत यांच्या निधनानंतर सावंत कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.
काही दिवसांपूर्वीच कै. सावंत यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले होते. यावेळी खा. राणे आणि सौ. नीलमताई राणे यांनी कै. सावंत यांच्या पत्नी, मुलगी आणि वडिलांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, माजी आमदार बाळासाहेब माने, भाजपचे जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके, शहर अध्यक्ष दादा ढेकणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.













