कवायतीसह प्रभातफेरीने दुमदुमली पेठदेव बाजारपेठ
लांजा (प्रतिनिधी) तालुक्यातील भांबेड पंचक्रोशी शिक्षण संस्था, भांबेड संचलित प्रतापराव माने विद्यालय आणि सुमित्रा देसाई कनिष्ठ महाविद्यालय, भांबेड येथे देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन जल्लोष आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष गणेश साळुंके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध कवायतीचे उत्कृष्ट सादरीकरण केले. देशभक्तीपर घोषणा देत विद्यार्थ्यांनी परिसर दुमदुमून टाकला.
यानंतर विद्यार्थ्यांची भव्य प्रभातफेरी काढण्यात आली. भारत माता की जय”, “वंदे मातरम्” आणि “जय हिंद” अशा घोषणांनी आणि देशभक्तीच्या जयघोषाने भांबेड-पेठदेव बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध संचलनाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
या कार्यक्रमास संस्थेचे सचिव संदीप जाधव, मुख्याध्यापक इलाही मुलाणी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ तसेच आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.













