वेंगुर्ले गटशिक्षणाधिकारी म्हणून अजय ढाणे यांनी स्वीकारला पदभार…

 

वेंगुर्ले : प्रतिनिधी

वेंगुर्ले पंचायत समिती मध्ये गटशिक्षणाधिकारी म्हणून श्री. अजय ढाणे यांनी पदभार स्वीकारला. सभापती शंकर घारे यांनी त्यांचे तालुक्याच्या वतीने स्वागत केले. यावेळी अन्य अधिकारी उपस्थित होते.

मु. कारेळवाडी पो. देगाव ता. जि. यवतमाळ येथील श्री. ढोणे यांची एम.पी.एस.सी.- २०२२ मधून प्रशिक्षणाधिकारी पदि निवड २ एप्रिल २०२५ रोजी झाली. प्रशिक्षणासाठी जिल्हा पंचायत येथे गेली वर्षभरापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात ते कार्यरत होते. केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी म्हणून कणकवली येथे सुद्धा पदभाराचे काम केले.

दरम्यान १३ ऑगस्ट पासून वेंगुर्ला गटशिक्षणाधिकारी म्हणून नवीन पदावरती रुजू झाले आहेत.