राज्यस्तरीय स्पर्धेकरिता मूल्यमापन
गुहागर प्रतिनिधी:
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये कोकण विभागामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेल्या तालुक्यांतील खामशेत ग्रामपंचायतची शुक्रवारी राज्यस्तरीय तपासणी समितीने पाहणी केली. राज्यस्तरीय स्पर्धेकरिता ही समिती मूल्यमापनाचे काम करत आहे.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामध्ये गुहागर तालुक्यातील खामशेत ग्रामपंचायतीने तालुका, जिल्हा तसेच विभाग पातळीवर प्रथम क्रमांक पटकावला आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानातील उपक्रमशील ग्रामपंचायत म्हणून नावलौकिक मिळवला आहे. विविध उपक्रम या ग्रामपंचायतीने यशस्वीपणे राबवले आहेत. यामुळे गुहागर तालुक्याचे नाव शुक्रवारी खामशेत ग्रामपंचायतचे राज्यस्तरापर्यंत झळकले आहे. आतापर्यंत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानासाठी तीन वेळा तपासणी करण्यात आली आहे.
या राज्यस्तरीय तपासणी समितीने प्रत्येक उपक्रमाचे पाहणी करून विविध केलेल्या कामांची नोंद करून घेतले आहे. या समितीचे अध्यक्ष भारतीय प्रशासक सेवा तथा ग्रामविकास व पंचायतराज विभागाचे सचिव डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार, पोपटराव पवार, राज्य ग्रामीण विकास संस्था यशदा पुणेचे
संचालक मल्लिनाथ कलशेट्टी, उमेदचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीधर दुबे पाटील, गिरीश सहभाग होता. भालेराव, राजाराम दिघे, प्रशांत पाटील असे एकूण सात सात जणांचा या तपासणी समितीमध्ये होते.












