संजीवनी डीएमएलटी नर्सिंग कॉलेजमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा

चिपळूण (प्रतिनिधी) : मंदार एजुकेशन सोसायटी आणि संजीवनी प्रशिक्षण संस्था संचलित संजीवनी डी. एम. एल. टी. नर्सिंग कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. संस्थेचे चेअरमन जगदीश वाघुळदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी उपस्थित मंदार एजुकेशन सोसायटीचे चेअरमन मंदार शिंदे, कॉलेजच्या सेक्रेटरी सौ हर्षा वाघुळदे, ऍडमीन ऑफिसर राजीव कांबळे, प्राचार्य श्रीम. खानापूरकर व शिक्षक वृषाली जाडे, तन्वी साळवी, अदिती पटवर्धन, वफा चिपळूणकर तसेच शिक्षकेतर वृषाली मालप, मयुरी शिगवण, सानिका देसाई, मंदार एजुकेशन सोसायटी सर्व स्टाफ, सर्व मान्यवर, विद्यार्थी वर्ग या सर्वांनी झेंड्याला सलामी दिली व राष्ट्रगीत तसेच ध्वजगीत गीत गायले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. यामध्ये संजीवनी नर्सिंग कॉलेजचे सर्व विद्यार्थी जी एन एम, डी ओ टी टी व डी एम एल टी विभागातील सर्व विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले. सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला. या कार्यक्रमाला संजीवनी नर्सिंग कॉलेजचे सर्व शिक्षक वर्ग व सहकारी कर्मचारी वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.