रत्नागिरी टिळक आळी येथील वृक्षाची ऑनलाइन फसवणूक
रत्नागिरी : प्रतिनिधी
शहरातील टिळक आळी येथील वृध्दाच्या बँकेतील एफडी खात्यातून अज्ञाताने तब्बल पावणे नउ लाख रुपये फिरवून काढून घेत फसवणूक केली. ही घटना शनिवार 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9.24 वा.सुमारास घडली.
सुहास दिगंबर सोहनी (61,रा.सोहम अपार्टमेंट टिळक आळी,रत्नागिरी) यांनी अज्ञाताविरोधात शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, शनिवार 15 ऑगस्ट रोजी सुहास सोहनी यांनी क्रॅप्टो ॲप मोबाईलमध्ये डाउनलोड करुन घेत स्वातंत्र्यदिनाच्या शूभेच्छा देण्यासाठी कार्ड तयार केले व तो ॲप अनइन्स्टॉल केला. परंतू त्यानंतर काही वेळाने अज्ञाताने फिर्यादी यांच्या बँकेतील एफडी खात्यावरुन एकूण8 लाख 62 हजार 400 रुपये बचत खात्यावर फिरवून ती रक्कम काढून घेतली. ही बाब सुहास सोहनी यांच्या लक्षात येताच त्यांनी रविवार 17 ऑगस्ट रोजी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 318(4) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66 (क),66(ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.













