रत्नागिरी ः प्रतिनिधी
शहरानजीकच्या खेडशी येथील रेल्वेच्या बोगद्यामध्ये काम करत असताना रेल्वेची धडक बसून गंभिर जखमी झालेल्या कामगाराचा उपचारांदरम्यान सोमवार 10 ऑगस्ट रोजी सकाळी 9.35 वा.सुमारास कोल्हापूर येथील विन्स हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.
दशरथ शांताराम बेंडल (51,रा.पाडावेवाडी मिरजोळे,रत्नागिरी) असे उपचारांदरम्यान मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. दशरथ बेंडल हे गुरुवार 6 ऑगस्ट रोजी खेडशी येथील रेल्वेच्या बोगद्यामध्ये काम करत होते. त्यावेळी रेल्वेची धडक बसल्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभिर मार लागून मेंदूमध्ये रक्तस्त्राव होउन त्यांच्या डोक्याची कवटी फ्रॅक्चर झाली होती. त्यांना अधिक उपचारांसाठी कोल्हापूर येथील विन्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी उपचार सुरु असताना सोमवार 10 ऑगस्ट रोजी सकाळी 9.35 वा.सुमारास त्यांचा मृत्यू झाला. याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्रूची नोंद करण्यात आली आहे.












