जिल्हा थ्रोबॉल असोसिएनशची 30 डिसेंबर रोजी निवड चाचणी

सब ज्युनिअर व सिनिअर मुली व मुलांच्या संघांच्या होणार स्पर्धा

रत्नागिरी : सब ज्युनिअर व सिनियर मुली व मुलांच्या राज्यस्तरीय थ्रोबॉल स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रत्नागिरी जिल्हा संघाची निवड चाचणी दि. 30 डिसेंबर रोजी करण्यात येणार असून, यासाठी जिल्ह्यातील संघांनी शुक्रवारी सकाळी 9 वा. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम मारुतीमंदिर रत्नागिरी येथे उपस्थित रहावले असे आवाहन करण्यात आले आहे.महाराष्ट्र थ्रोबॉल असोसिएशन व सोलापूर थ्रोबॉल असोसिएशनच्यावतीने दि. 6, 7 व 8 रोजी राज्यस्तरीय सब ज्युनिअर व सिनिअर मुले व मुलींची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत रत्नागिरीचा संघ सहभागी होणार असून, त्यासाठी दि. 30 डिसेंबर रोजी निवड चाचणीस्पर्धा रत्नागिरीतील मारुतीमंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे आयोजित करण्यात आली आहे. सकाळी 9 वाजता निवड चाचणीमध्ये सहभागी होऊ इच्छिणार्‍या संघानी मैदानावर उपस्थित रहावे असे आवाहह जिल्हा थ्रोबॉल असोसिएशनच्यावतीने करण्यात आले आहे.