सुदेवाने मोठा अनर्थ टळला..
वेंगुर्ले : प्रतिनिधी
आजगाव मळेवाड राजगड रिसॉर्ट च्या बाजूला सकाळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख सिद्धेश उर्फ भाई परब यांच्या गाडीला अपघात झाला. मात्र सुदेवाने मोठा अनर्थ टळला.
भाजी विक्रेता मळेवाड येथून शिरोडा दिशेने सकाळी ७.३० च्या सुमारास भाजी विकायला टेम्पोन जात होता. टेम्पोच्या समोर झाडाची काठी आल्यामुळे त्याचा गाडीवरील ताबा सुटल्याने समोरून येणाऱ्या सिद्धेश उर्फ भाई परब यांच्या गाडिला त्याने एका बाजूने ठोकले. सुदैवाने मोठा अनर्थ टळला. मात्र त्यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. भाई परब हे आईला सोबत घेऊन गोवा येथे जात होते. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी वेंगुर्ला युवक काँगेस अध्यक्ष प्रथमेश उर्फ बड्या परब व जिल्हा परिषद सदस्य सुधा कवठणकर पोचून त्यांनी गाडयांना बाजूला करून रस्ता वाहतूकिस सुरळीत केला.













