रणझुंजार ३८+मित्रमंडळ ओटवणे आयोजित भव्य मोफत हृदय रोग तपासणी शिबीर.

ओटवणे (प्रतिनिधी ) ओटवणे येथे मंगळवारी २५ ऑगस्ट रोजी रणझुंजार ३८+ मित्रमंडळ, ओटवणे आयोजित डॉ. जी. टी. राणे हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर कुडाळ यांच्या साहाय्याने भव्य मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून रवळनाथ विद्यामंदिर ओटवणे येथे ९ ते १. 00 या वेळेत आयोजित करण्यात आले आहे या शिबिरात डायबेटीस तपासणी, रक्तदाब तपासणी, ईसीजी, हृदया संबंधी इतरही तपासण्या केल्या जाणार आहेत. तरी याचा लाभ ग्रामस्थांनी तसेच हृदय रोग असणाऱ्या रुग्णांनी घ्यावा असे आवाहन रणझुंजार 38+ कडून करण्यात आले आहे. तसेच रुग्णांनी येताना आपल्या डॉक्टरांची सुरु असणारी औषधे फाईल्स घेवून यावे.

एका क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने सुरु करण्यात आलेलं रणझुंजार 38+ क्रिकेट क्लब आज रणझुंजार 38+ मित्रमंडळाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवित आहे क्रिकेट स्पर्धेबरोबरच रक्तदान शिबीर, श्रमदान शिबीर, आरोग्य शिबीर,वृक्षा रोपण याच बरोबर रुग्णवाहिकेच्या माध्यमातून रुग्ण सेवा देत आहे. अल्पावधितच या मंडळाने नाव लौकिक मिळवीला आहे.गावात विविध सामाजिक उपक्रम राबवत सामाजित कार्यात हातभार लावत आहे. मंडळाच्या माध्यमातूनच हे भव्य हृदय रोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे या शिबिराचा रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन रणझुंजार 38+ मित्रमंडळ ओटवणे यांच्यावतीने करण्यात आले आहे.