गौरव पोंक्षे माखजन:
भारतातील नेहमीच चर्चिल्या जाणाऱ्या बेरोजगारीला येथील युवा पिढीच जबाबदार आहे.ज्या वेळी देशातील प्रत्येक युवकाला आपल्या श्रमाची प्रतिष्ठा वाटेल, त्यावेळी बेरोजगारी आपोआप नष्ट होईल असा विश्वास कोकण प्रांत संस्कृत भारतीचे सहमंत्री ॲड आशिष आठवले यानी व्यक्त केला.ते संगमेश्वर तालुक्यातील सरंद श्री गजाजन मंगल कार्यालयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या युवा मेळाव्यात बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर महेश साळुंके,दिलीप जोशी,रवींद्र रजपूत,महेश जड्यार आदी उपस्थित होते.
श्री आठवले पुढे म्हणाले की,आज ज्या युवकांचे सन्मान झाले ते काम ए आय करू शकणार नाही.त्यामुळे आज ज्या कार्यासाठी पुरस्कार दिले गेले ते प्रत्येकाला, नक्कीच ऊर्जा देणारे ठरतील.भारतातील नागरिकांचे सरासरी वय २९ आहे.त्यामुळे जगाच्या पाठीवर ऐन तारुण्यात असलेला एकमेव देश तो म्हणजे भारत आहे.त्यामुळे देशाला पुढे नेण्याचे आणि गत वैभव मिळवून देण्याची जबाबदारी ही युवकांचीच असल्याचे नमूद केले.युवा शक्ती ही भारताची मोठी संपत्ती असल्याचे नमूद केले.व युवकांना जागे व्हा असे आवाहन केले.
दरम्यान या युवा संमेलनात तालुक्यातील युवा वर्गाला आदर्श ठरेलं अशा युवकांचा व काही सांघिक काम करणाऱ्या युवकांचा सन्मान करण्यात आला.यामध्ये संदेश फडकले(युट्युबर),गौरव पोंक्षे (पत्रकार),सिद्धेश चव्हाण(छ.संभाजी महाराज प्रतिष्ठान नित्य पूजा),प्रसाद पाटील(व्यावसायिक),निलेश कवळकर(व्यावसायिक),देवेंद्र कातकर(दूध उत्पादन,पशुपालन),अमोल बाटे(गोपालन),माखजन कुंभारवाडी युवक(हरिपाठ),बुरंबाड कवळकर वाडी (पारंपरिक जाखडी नृत्य,सांघिक),जितेंद्र कोलथसकर(आदर्श सेवक),ओंकार शिगवण(व्यावसायिक),शेखर उकार्डे(समाजसेवा) आदिना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.प्रशस्तिपत्रक,शाल,श्रीफळ,पुष्प,झाड,पुस्तके,सकस आहार,असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
यावेळी गौरव पोंक्षे,संदेश फडकले,सिद्धेश चव्हाण आदिनी सत्कारोत्तर राष्ट्रीय स्वयं संघाने दिलेल्या पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.यावेळी भूषण कवळकर यांनी सांघिक गीत तर
आशिष घाग यांनी वैयक्तिक गीत सादर केले.यावेळी प्रसाद कवळकर,संदेश पोंक्षे,धुलेश्वर दर्डे,स्वप्नील बापट,प्रमोद बापट,दिलीप काजवे,अजिंक्य पावसकर,सुयोग साठे,राहुल पाटणकर आदिंसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमांचे बहारदार सूत्रसंचालन सचिन साठे यांनी केले.तर वंदेमातरम व स्नेह भोजनाने सांगता झाली.













