रत्नागिरी ः प्रतिनिधी
चार जिल्ह्यातून दोन वर्षांकरता हद्दपार करण्यात आलेला संशयित रत्नागिरीतील आठवडा बाजार येथे मिळून आल्याप्ररकणी त्याच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवार 24 आगस्ट रोजी रात्री 8.10 वा.सुमारास उघडकीस आली.
अमिर नजिर मुजावर (40,रा.राजीवडा नाका,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस हवालदार दिपराज पाटील यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, संशयित आरोपीला रत्नागिरी उपविभागीय दंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 56(1)(अ) अन्वये रत्नागिरी,सिंधुदुर्ग,कोल्हापूर व रायगड या चार जिल्ह्यांमधून 2 वर्षांकरता हद्दपार करण्याचे आदेश 14 डिसेंबर 2025 रोजी दिले होते. त्या आदेशांचे पालन करता संशयित हा सोमवारी रात्री शहरातील आठवडा बाजार येथे मिळून आला होता. त्याच्या विरोधात महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 141,142 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Home महत्वाच्या बातम्या रत्नागिरी पोलिसांची कारवाई; आठवडा बाजारात आढळलेल्या तडीपार आरोपीवर गुन्हा दाखल













