बांदा- दाणोली जिल्हा मार्गाच्या रखडलेल्या कामाला पुनः एकदा मुहूर्थ सापडला

ओटवणे (प्रतिनिधी ) बांदा – दाणोली मार्गाचे गेल्या दोन महिन्यापासून बंद असणारे रखडलेले काम अखेर आज पुनः सुरु करण्यात आले.या जिल्हा मार्गाच्या नूतनीकरण आणि रुंदीकरणाला सुरुवात झाल्यापासून बांदा दाणोली मार्गाचे हे काम सातत्याने रखडत आहे.विलवडे वड ते ओटवणे, सरमळे नदीवरील पुलापर्यंत रस्त्याची अतिशय बिकट अवस्था झाली आहे.सार्वजनिक बांधकाम खात्याचा मनमानी कारभारामुळे या कामाला ग्रामस्थांचा सुरुवातीला विरोध ही झाला होता मात्र कामाला सुरुवात झाली आणि यंत्रणा ठेकेदार यांच्या दिरंगाई मुळे गेली दोन महिने हे काम रखडले होते.त्यामुळे अर्धवट केलेलं काम खोदून ठेवलेला रस्ता, पसरून ठेवलेली खडी यामुळे सध्या या मार्गात मोठं मोठे खड्डे पडले जे अपघाताला कारणीभूत ठरत होते त्यातच लहान मोठे अपघातही घडत होते.याचा मनस्थाप वाहन चालकांना सहन करावा लागत होता.याची वारंवार कल्पना संभंधित यंत्रणेला अधिकाऱ्यांना देऊनही अर्धवट काम पूर्ण होत नव्हते. अखेर आज या बंद असणाऱ्या कामाला पुनः एकदा मुहूर्थ मिळाला आणि कामाला सुरुवात झाली. हे काम सुरु झाले असले तरी पुनः बंद पडणार नाही याची दक्षता संभंधित यंत्रणा ठेकेदार यांनी घेवून ज्या गतीने या कामाची सुरुवात झाली त्याच गतीने काम पूर्ण करावे ही अपेक्षा सध्या वाहन चालक करीत आहेत.