गौरव पोंक्षे माखजन:
संगमेश्वर तालुक्याती आंबव पोंक्षे जिल्हा परिषदेच्या शाळेत चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या स्वरा मंगेश शिगवण,मंथन मिथुन बाष्टे यांना गौरविण्यात आले.यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुशील भायजे,सरपंच शेखर उकार्डे,शाळा व्यवस्थापन समिति अध्यक्ष प्रकाश कदम मुख्याध्यापिका सौ प्राची पाटणकर आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुशील भायजे यांनी शालेय गुणवत्ता,पोषण आहार,भौतिक सोयी सुविधांची पाहणी केली.अडचणी जाणून घेतल्या.विद्यार्थ्यांशी देखील मनमोकळ्या गप्पा मारल्या.
यावेळी गणवेश,पोषण आहार,पाठ्यपुस्तके पुरवठ्याबाबत सुशील भायजे यांनी आढावा घेतला.
शाळेतील कामकाजा बद्दल समाधान व्यक्त केले.












