रत्नागिरीच्या उपविभागीय पोलीस अधिकारीपदी IPS अरांक्षा यादव रुजू

DySP नीलेश माईणकर यांनी केले स्वागत

रत्नागिरी:
रत्नागिरी उपविभागाच्या नूतन उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) म्हणून २०२३ बॅचच्या परिविक्षाधीन भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकारी अरांक्षा यादव यांनी आज आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी मावळते उपविभागीय पोलीस अधिकारी DySP नीलेश माईणकर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने २५ ऑगस्ट रोजी राज्यातील १२ परिविक्षाधीन आयपीएस अधिकाऱ्यांच्या पदस्थापनेचे आदेश जारी केले होते. त्यानुसार अरांक्षा यादव यांची रत्नागिरी येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
मूळच्या कोल्हापूरच्या सुपूत्री
अरांक्षा यादव या मूळच्या कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी येथील रहिवासी आहेत. त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी, हैदराबाद येथील ‘Phase II Training of Basic Course (74 RR)’ हे संस्थात्मक प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करून महाराष्ट्र संवर्गात सेवा सुरू केली आहे.