माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतीदिनी विनम्र अभिवादन

आमदार निलेश राणे जनसंपर्क कार्यालय मालवण येथे शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांची माँसाहेब यांना आदरांजली

मालवण | प्रतिनिधी : शिवसैनिकांची मायेची सावली आणि सर्वांची माऊली, वात्सल्यमूर्ती स्वर्गीय माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतीदिनी मालवण येथील आमदार निलेश राणे यांच्या जनसंपर्क कार्यालयात त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. नगराध्यक्षा ममता मोहन वराडकर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

 

यावेळी नगराध्यक्षा ममता मोहन वराडकर, उपनगराध्यक्ष तथा शिवसेना शहरप्रमुख दीपक पाटकर, कुडाळ मालवण विधानसभा क्षेत्रप्रमुख बबन शिंदे, कुडाळ मालवण विधानसभा प्रवक्ते राजा गावकर, उपजिल्हाप्रमुख विश्वास गावकर, नगरसेविका नीना मुंबरकर, महिला व बालकल्याण उपसभापती अश्विनी कांदळकर, शिवसैनिक राजेंद्र परुळेकर, दत्ता नेरकर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

 

माँसाहेब मीनाताई ठाकरे शिवसेना परिवाराला मातेसमान माया, प्रेम आणि आधार दिला. त्यांच्या साधेपणाने, वात्सल्याने आणि शिवसैनिकांप्रती असलेल्या जिव्हाळ्याने त्या शिवसैनिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करून गेल्या. त्यांच्या स्मृतीदिनी उपस्थितांनी त्यांच्या कार्याला व स्मृतींना उजाळा देत आदरांजली अर्पण केली.