मसुरे | झुंजार पेडणेकर : पळसंब वरचीवाडी येथे गवारेडा यांनी नुकसान केलेल्या नाचणी शेतीची पाहणी वनविभागाकडून करण्यात आली.यावेळी वनरक्षक लक्ष्मण आमले, पळसंब सरपंच श्री. चंद्रकांत गोलतकर, ग्रामपंचायत सदस्य श्री. अविराज परब, शेतकरी श्री. मेघश्याम गोलतकर, मयुरी वायंगणकर, दिनेश साईल,पुरुषोत्तम साईल इत्यादी उपस्थित होते. यावेळी वनरक्षक यांनी नुकसान भरपाई बाबत मार्गदर्शन केले.भातशेती साठी 548 रुपये प्रति गुंठा,नाचणी 836 रुपये , भुईमूग 980 रुपये प्रति गुंठा अशा प्रकारे नुकसान भरपाई मिळते. तरी नुकसानग्रस्त शेतकरी यांनी वनवीभागाशी संपर्क साधावा असे आवाहन वन विभागाने केले आहे.













