डीबीजेच्या विद्यार्थ्यांची कृषी केंद्राला क्षेत्र भेट

चिपळूण (प्रतिनिधी) : नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्या डीबीजे महाविद्यालय (स्वायत्त) राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे वतीने क्षेत्र भेट या उपक्रमांतर्गत लवेल येथील गरबा कृषी केंद्राला भेट दिली. कोकणातील विद्यार्थी उपजिविकेसाठी गावात न राहता शहरामध्ये स्थायिक होत आहेत. यादृष्टीने विद्यार्थ्यांना कोकणात पर्यटन व्यवसाया व्यतिरिक्त उपलब्ध असलेल्या कृषीपूरक व्यवसाय संधींबद्दल माहिती देण्यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची लवेल येथील घरडा कृषी केंद्र येथे भेट आयोजित करण्यात आली.
कृषीपूरक व्यवसाय करण्याचे महत्त्व आणि कोकणातून नोकरी निमित्ताने शहरात स्थलांतर होण्याऐवजी जोडधंदा म्हणून कृषीपूरक व्यवसाय याबद्दल नाम फाउंडेशन यांचे प्रथमेश पोमेंडकर आणि घरडा फाउंडेशनचे वैभव सनगर यांनी मार्गदर्शन केले. यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे ४३ विद्यार्थी सहभागी झाले. तसेच ही भेट आयोजित करण्यासाठी चेतन खांडेकर, प्रा. अविनाश पालशेतकर, प्रा. पायल गोसावी, प्रा. कांचन तटकरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.