कु. कुंजन पटेल द्वितीय, तर कु. अतुल कदम चतुर्थ; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
देवरूख (प्रतिनिधी):
संगमेश्वर तालुक्यातील बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्था संचलित दादासाहेब सरफरे विद्यालय व कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय, बुरंबी-शिवने या कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले.
शालेय शिक्षण व युवक कल्याण क्रीडा विभाग तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी रत्नागिरी आयोजित देवरुख येथे १९ वर्षे वयोगटातील बुद्धिबळ स्पर्धेत कु. कुंजन पटेल (१२वी वाणिज्य)हिने द्वितीय क्रमांक, तर कु. अतुल कदम ११ वी वाणिज्य)याने चतुर्थ क्रमांक पटकाविला. या दोन्ही विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. बुद्धिबळातील हे यश विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्ता, एकाग्रता व चिकाटीचे प्रतीक असून, जिल्हास्तरीय स्पर्धेतही त्यांनी उत्तम कामगिरी करावी, अशी शुभेच्छा देवून विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले. तसेच जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल दोन्ही विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.













