राजापूर (वार्ताहर): राजापूर तालुक्यातील येरडव येथील रहिवासी व दै. प्रहारचे पाचल वार्ताहर उमेश दळवी यांच्या पत्नी सौ. आकांक्षा उमेश दळवी (४८) यांचे शुक्रवारी ११ सप्टेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
गेले काही दिवस त्यांची प्रकृती बरी नव्हती. त्यांच्यावर उपचार देखील सुरू होते. मात्र शुक्रवारी त्यांची प्रकृती अचानक खालावली व त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर शनिवारी येरडव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पती उमेश यांसह, दोन मुलगे, सासू, सासरे, दिर, नणंद, जाऊ असा परिवार आहे.












