सावंतवाडी । प्रतिनिधी : मूळचे दाणोली बाजारपेठ येथील आणि सध्या माडखोल-मेटवाडी येथील रहिवासी सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक सुनील सदाशिव सुकी (७१) यांचे बुधवार १६ सप्टेंबर रोजी रात्री निधन झाले. त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रासह दाणोली व माडखोल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सून, एक भाऊ, भावजय, पुतणे, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. सावंतवाडी येथील अॅड. सुमित सुकी यांचे ते वडील होत. बेळगावस्थित अनिल सुकी यांचे ते भाऊ, तर सावंतवाडी पंचायत समितीचे सदस्य तथा दाणोलीचे माजी उपसरपंच प्रशांत सुकी, शिरोडा येथील बावडेकर कनिष्ठ विद्यालयाचे निवृत्त मुख्याध्यापक उमेश सुकी, सावंतवाडी एसटी डेपोचे निवृत्त वाहक सुदेश सुकी आणि बेळगावस्थित सदाशिव सुकी यांचे ते काका होत.











