पाच दिवसांच्या गौरी-गणपतीचे विसर्जन.

राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत व आमदार किरण सामंत यांच्या वेंगुर्ले मूळ निवासस्थानी गणरायाचे विसर्जन

वेंगुर्ले… प्रतिनिधी

गौरी गणपती बाप्पाला जड अंतकरणाने विसर्जन करण्यातआले. ‘पुढच्या वर्षी लवकर या’ च्या गजरात साश्रू नयनांनी निरोप देण्यात आला. श्रद्धा, उत्साह आणि पारंपरिक वातावरणात साजरा होणाऱ्या लाडक्या गणेशोत्सवाचा आणि गौरीचा सोहळ्याचा संपन्न झाल्यानंतर आज गौरी-गणपती विसर्जनाचा सोहळा पार पडला.गौरीसोबतच ज्यांच्या घरी पाच दिवसांच्या लाडक्या गणरायाची प्रतिष्ठापना केली होती, त्या बाप्पांच्या मूर्तींचेही विसर्जन आज करण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत व आमदार किरण सामंत यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले या मूळ गावी पाच दिवस गणपती विराजमान असतो आज पाचव्या दिवशी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दर्शन बाप्पाचे घेतले तर आमदार किरण सामंत यांनी पाच दिवसाच्या गणेशाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला या मिरवणुकीच्या वेळी किरण सामंत हे भावूक झाले होते

जिल्ह्यातील नदी, विहीर, समुद्रकिनाऱ्यांवर, विसर्जन घाटांवर बाप्पाच्या विसर्जनासाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली. ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि आरत्यांच्या आवाजात बाप्पाला निरोप देताना लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचेच डोळे पाणावले होते. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत आमदार किरण सामंत यांचे समवेत शिवसेना जिल्हाप्रमुख संजीव परब, शहर प्रमुख अजित राऊळ, पिंट्या गावडे आदी उपस्थित होते.