ओ.टी.पी.नाही तर सिलेंडर पण नाही.यामुळे ग्रामीण जनता त्रस्त

गौरव पोंक्षे माखजन
इराण अमेरिका,इस्रायल युद्धा पासून घरगुती,आणि व्यावसायिक सिलेंडर पुरवठ्याच्या नियमावलीत मोठा बदल केला होता.केंद्र,व राज्य शासनाने देखील अनेक नियम,अटी लागु केल्या होत्या.यामधील एक मुख्य अट म्हणजे नोंदणीकृत मोबाईल वार येणारा ओटीपी.
सध्या ओटीपी नाही तर सिलेंडर नाही अशी स्थिती ग्रामीण भागात झाली आहे.सिलेंडर घेऊन ग्राहकाच्या घरी पोहचल्यावर,संबंधित ग्राहक ओटीपी देऊ शकला नाही तर चक्क बुक असलेला सिलेंडर ग्राहकाला न देता,पुन्हा माघारी नेला जात आहे.
अजून ही ग्रामीण भागात मोबाईल ना नेटवर्क नाही अशी परिस्थिती आहे.वाडी तेथे नेटवर्क अशी जणू परिस्थिति असल्यासारखी शासनाने ओटीपी ची सक्ती केली आहे.द बी.एस.एन.एल कनेक्टिंग इंडिया अस म्हणणाऱ्या शासनाच्या बी.एस.एन.एल मोबाईल ला पंधरा पंधरा दिवस नेटवर्कच नसते.म ग्राहकांनी काय कराव असा प्रश्न विचारला जात आहे. अनेकवेळा ग्राहक नेटवर्क मध्ये गेल्यावर आपल्या सोयीनुसार सिलेंडर बुक करतो.ज्यावेळी बुक करतो त्यावेळी ओटीपी प्राप्त होत नाही.
कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्यावेळी गाडी सिलेंडर वितरणासाठी निघणार असते त्यावेळी पावत्या बनवल्या जातात.यावेळी ग्राहकाला ओटीपी रवांना होतो.ही वेळ कोणत्याच ग्राहकांना माहित नसल्याने नेटवर्क मध्ये सतत नसलेल्या ग्राहकांना ओटीपी मिळत नाही.खूप वेळ नेटवर्क बाहेर असल्यावर कालांतराने ओटीपी नेटवर्क मध्ये जाऊन देखील प्राप्त होत नाही.
ग्राहकाकडे ओटीपी नसेल तर,कंपनीची गाडी ग्राहकाकडे पोहचल्यावर,पुन्हा ऑफिस मधून ओटीपी पाठवण्यास सांगू शकते.परंतु ग्राहकांच्या घरी नेटवर्कच नसेल तर ओटीपी कसा येणार हा मोठा प्रश्न आहे.
ज्यावेळी ग्राहक सिलेंडर बुक करतो त्यावेळीच ओटीपी मिळाला तर अनेक प्रश्न सुटू शकतात असे ग्राहकांचे म्हणणे आहे.शिवाय रजिस्टर मोबाईल नंबर वरून सिलेंडर बुक केल्यावर ओटीपी ची गरज काय,?शिवाय के.वाय.सी.पूर्ण असताना पुन्हा पुन्हा ओटीपी.कशासाठी असा सवाल उपस्थित केला जात आहे.सिलेंडर वितरणासाठी येणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्याला ग्राहकाची ओळख असतेच त्यामुळे सिलेंडर चुकीच्या माणसाने फसवणूक करून घेतला अस होऊ शकत नाही.किंबहुना रजिस्टर मोबाईल नंबर ज्याच्या हातात आहे.तोच सिलेंडर बुक करत असेल.तर पुन्हा ओटीपी कशासाठी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सिलेंडर वितरण करण्यापूर्वी ओ.टि.पी मागण्याची अट तात्काळ रद्द् करा अशी मागणी ग्रामीण जनतेकडून केली जात आहे.जे नियम शहरात आहेत तेच नियम ग्रामीण भागात लागू करताना गावागावात नेटवर्क आहे का याची चाचणी आधी झाल्यावर,ओटीपी ची सक्ती करणे योग्य होते.पण तसे न झाल्याने ग्रामीण भागात सिलेंडर बुक करून तो मिळेपर्यंत डोकेदुखी बनली आहे.