मुंडे महाविद्यालयाच्या विद्यार्थी मंडळ सचिव पदी प्रथमेश जाधव याची बिनविरोध निवड

  मंडणगड (प्रतिनिधी)दि.  : येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातून  विद्यार्थी मंडळ सचिव म्हणून तृतीय वर्ष  विज्ञान वर्गातील प्रथमेश  जाधव याची महाविद्यालयाच्या परंपरेप्रमाणे बिनविरोध निवड  झाली आहे.
सर्व वर्ग प्रतिनिधी, प्राचार्य नियुक्त प्राध्यापक व विद्यार्थी-विद्यार्थीनी  प्रतिनिधी  यांच्या संयुक्त सभेत चालू शैक्षणिक वर्षाच्या विद्यार्थी मंडळाच्या सचिव पदी एका विद्यार्थी-प्रतिनिधीची निवड करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली व त्यानंतर प्रथमेश  जाधव याची सचिव पदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
प्रथमेश जाधव हा महाविद्यालयातील एक मनमिळावू विद्यार्थी म्हणून सर्वांना परिचित आहे. त्याने एन.एस.एस, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात नैपुण्य मिळविलेले आहे. त्याच्या निवडीने महाविद्यालय परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
या निवडीबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री कर्मवीर मा. दादा इदाते, अध्यक्षा सौ. संपदाताई पारकर, कार्याध्यक्ष श्री. श्रीराम इदाते, कार्यवाह प्रा. सतिश  शेठ, संस्था पदाधिकारी, महाविद्यालयाचे  प्रभारी प्राचार्य वाल्मिक परहर,  उपप्राचार्य डॉ. विष्णु जायभाये सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रथमेश जाधव व सर्व वर्गप्रतिनीधींचे हार्दिक  अभिनंदन केले आहे.