चिपळूण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासन जलसंपदा उपविभाग चिपळूण आणि अर्थ फाउंडेशन, ग्लोबल चिपळूण टुरिझम, सह्याद्री निसर्ग मित्र, सेवा साधना प्रतिष्ठान या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने “जल साक्षरता” व “चला जाणू या नदीला” अभियान अंतर्गत रविवार दि. २७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र चिपळूण येथे साजरा केला जाणार आहे.
प्रसिद्ध नदी संरक्षक मार्क अँजेलो (Mark Angelo) यांनी जगभरात नदी उत्सव साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यांच्या या प्रस्तावाला आणि संयुक्त राष्ट्राच्या (UN) ‘वॉटर फॉर लाइफ’ (Water for Life Decade) या उपक्रमाला प्रतिसाद देत २००५ मध्ये पहिल्यांदा जागतिक नदी दिन साजरा करण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी सप्टेंबरच्या चौथ्या रविवारी जगभरात हा दिवस मोठ्या उत्साहात पाळला जातो. हा एक जागतिक उत्सव आहे, जो लाखो स्वयंसेवक, पर्यावरणवादी आणि स्थानिक समुदायांना एकत्र आणतो. जलमार्ग किती मौल्यवान आहेत याबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि त्यांच्या संवर्धनासाठी प्रत्येकाने काहीतरी कृती करावी यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे हा दिवस आंतरराष्ट्रीय नद्यांसाठी महत्त्वाचा आहे, कारण तो आपल्याला या मुक्तपणे वाहणाऱ्या जलमार्गांमुळे जगभरात मिळणाऱ्या अनेक पर्यावरणीय, सामाजिक आणि आर्थिक फायद्यांची आठवण करून देतो. नद्या, मग त्या मोठ्या असोत वा लहान, वन्यजीवांचे पोषण करतात, पिण्याच्या पाण्याचा स्रोत म्हणून काम करतात आणि जगभरातील कृषी प्रणालींना ऊर्जा पुरवतात. या करिता या नद्यांचे आपल्या जीवनसृष्टीतील महत्त्व लोकांना समजवून सांगून जनजागृती निर्माण करणे, नद्यांमध्ये वाढणारा कचरा आणि प्रदूषण रोखणे, अतिक्रमणाला आळा घालणे तसेच नद्यांचे पुनरुज्जीवन करणे नद्यांचे संवर्धन व रक्षण करणे नद्यांवर अवलंबून असणारे प्राणी, वनस्पती आणि मानवी जीवन वाचवणे एकंदरीत पर्यावरणाचे संतुलन राखणे हा या दिवसाचा उद्देश आहे.
जागतिक नदी दिन २०२६ ची अधिकृत संकल्पना “जंगल नाही, नद्या नाहीत, पाणी नाही, जीवन नाही” जागतिक पर्यटन दिन विकासातील पर्यटनाच्या भूमिकेबद्दल अधिक जागरूकता निर्माण करण्याच्या संयुक्त राष्ट्रांच्या पर्यटन संस्थेच्या प्रयत्नांपासून सुरू झाला हा दिवस साजरा करण्याची सुरुवात सर्वप्रथम १९८० मध्ये स्थापना होणे पूर्वी UNWTO म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि आता UN Tourism म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संस्थेने केली होती. जागतिक पर्यटन दिन २०२६ ची अधिकृत संकल्पना “पर्यटनाची पुनर्रचना करण्यासाठी डिजिटल अजेंडा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता” ही आहे . ही संकल्पना पर्यटन क्षेत्रातील डिजिटल परिवर्तनाचे वाढते महत्त्व अधोरेखित करते. तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि कृत्रिम बुद्धिमत्ता पर्यटन व्यवस्था, पर्यटकांचे अनुभव आणि भविष्यातील नियोजन कसे सुधारू शकतात, यावर ही संकल्पना चर्चेला प्रोत्साहन देते. त्याचवेळी, पर्यटनाला अधिक प्रभावी, सुलभ आणि बदलत्या जागतिक गरजांना प्रतिसाद देणारे बनवण्याच्या व्यापक उद्दिष्टाशी ही संकल्पना नवोन्मेषाला जोडते. बहुतांश मनुष्य जात हि पर्यावरणाचा व निसर्गाचा ऱ्हास करीत आहे. आता भावी पिढी Gen- Z युवा वर्ग या बाबीशी जोडला जाणे अत्यावश्यक आहे जागतिक नदी दिवस व जागतिक पर्यटन दिन हा यावर्षी प्रामुख्याने चिपळूण शहर आणि परिसरातील महाविद्यालये सोबत घेवून साजरा केला जाणार आहे.
आज सर्वचजण क्षणिक किंवा नश्वर विकास व ध्येय घेवून चाललेला दिसून येत आहे युवा वर्ग हा शाश्वत विकासाचे जीवनाचे ध्येय उद्दिष्ट समोर ठेवून चालावा, सेंद्रिय कृषी क्षेत्र, निसर्ग, जंगल, नदी, जल व याच अनुषंगाने पर्यटन इत्यादी क्षेत्राकडे आकर्षिला जावा आणि त्यावरच आधारित पूरक रोजगार उद्योग संधीचे व्यवसायात रुपांतर करता व्हावा, युवा वर्गाचे स्थानिक गावातून शहर व महानगराकडे होणारे स्थलांतर कमी करून त्यांना आपल्या मूळ गावीच पर्याय उपलब्ध करून द्यावे व त्याची सर्वांगीण उन्नत्ती व्हावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात सह्याद्री शिक्षण संस्थेचे सती महाविद्यालय, डि. बि. जे महाविद्यालय, गुरुकुल, आनंदराव पवार महाविद्यालय, ए इ काळसेकर महाविद्यालय, गुरुकुल महविद्यालय, नॅशनल कॉलेज मिरजोळी , रिगल कॉलेज कोंढे, आर सि कॉलेज पेढे परशुराम, सुरेश दामोदर गद्रे कनिष्ठ महाविद्यालय, एस पि एम कॉलेज चे विद्याथी मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत. निसर्ग, जंगल , नदी, जल, कृषी, पक्षी निरीक्षण, पर्यटन इत्यादी विषयावर पथ नाट्य , नाटिका, प्रहसन (स्कीट ) समूह गीत, जन जागृती पर वक्तृत्व, भारुड या सारखे कार्यक्रम युवा वर्ग कडून सदर केले जाणार आहेत, यासोबत चिपळूण व लगतचे परिसरातील पर्यावरण पूरक पर्यटन व निगडीत यशस्वी उद्योजकांची यशोगाथा व मार्गदर्शन केले जाणार आहे.
या कार्यक्रमात समस्त निसर्ग प्रेमी, पर्यावरण प्रेमी, समाजिक शैक्षणिक, युवा मंडळे संस्था व्यक्ती यांनी सहभागी व्हावे असे आवाहन संयोजाकामार्फात केले गेले आहे. अधिक माहिती करिता शाहनवाज शाह ९८२२८२०३९५, समीर कोवळे ८८८८०६३३५७ यांचेजवळ संपर्क साधावा.












