राजापूर अर्बन बँकेची ग्राहक, व्यापाऱ्यांसाठी स्वत:ची क्यू आर कोड सेवा सुरू लवलकरच आ. किरण सामंत यांच्या हस्ते होणार शुभारंभ

राजापूर (प्रतिनिधी): राजापूर अर्बन को. ऑप बँकेने आपल्या असंख्य ग्राहक, व्यापारी यांच्यासाठी स्वताची क्यू आर कोड सेवा कार्यान्वयीत केली आहे. लवकरच या सेवेचा शुभारंभ आमदार किरण सामंत यांच्या हस्ते होणार आहे. तशी माहिती अध्यक्ष एड. शशिकांत सुतार यांनी दिली आहे.
आधुनिकतेची कास धरत आपला कारभार करणारी  व आपल्या ग्राहकांना अत्याधुनिक सेवा देणारी बँक अशी राजापूर अर्बन बँकेची ओळख आहे. बँकेने यापुर्वीच आपल्या ग्राहकांना मोबाईल एप सह अन्य विविध आधुनिक सेवा पुरविल्या आहेत. आता बँकेने आपला स्वताचा क्यू आर कोड सेवा सुरू केली आहे. याचा फायदा बँकेचे ग्राहक व व्यापाऱ्यांना होणार आहे. राजापूर शहरासह बँकेच्या सर्व शाखा ज्या ज्या भागात आहेत त्या त्या भागातील अनेक छोटे मोठे व्यापारी हे बँकेचे ठेवीदार, कर्जदार आहेत. त्यामुळे याचा लाभ त्यांना होणार आहे. खास करून छोटया व्यापाऱ्यांना याचा विशेष लाभ होणार आहे.
लवकरच या सवेचा शुभारंभ आ. किरण सामंत यांच्या हस्ते केला जाणार असल्याचे एड. सुतार यांनी सांगितले.