आमदार निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून ९ तलाठी कार्यालयांसाठी इमारत बांधकामे मंजूर.

कुडाळ तालुक्यातील ७ तर मालवण तालुक्यातील २ अश्या एकूण ९ तलाठी कार्यालयांना इमारत बांधकामासाठी एकूण १ कोटी ४८ लाखांचा निधी मंजूर.

कुडाळ व मालवण तालुक्यात आमदार निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार पालकमंत्री नितेश राणे व खासदार नारायणराव राणे यांच्या माध्यमातून तालुक्यातील जीर्ण झालेल्या किंवा स्वतंत्र तलाठी कार्यालय इमारत अस्तित्वात नसल्याने तलाठी सजांसाठी नवीन इमारती जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर करण्यात आली असून यात कुडाळ तालुक्यातील गोठोस तलाठी व मंडल अधिकारी कार्यालयासाठी २३ लाख, आंब्रड तलाठी कार्यालय १४ लाख, कुंदे तलाठी कार्यालय १४ लाख, घोटगे तलाठी कार्यालय १४ लाख, निरूखे तलाठी कार्यालय १४ लाख, वर्दे तलाठी कार्यालय १४ लाख, सिंधुदुर्ग नगरी ओरोस तलाठी व मंडल अधिकारी कार्यालय २२ लाख व मालवण तालुक्यातील किर्लोस तलाठी कार्यालय १४ लाख, मसुरे देऊळवाडा तलाठी व मंडल अधिकारी कार्यालय २० लाख असा एकूण ९ तलाठी कार्यालय इमारत बांधकामसाठी १ कोटी ४८ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.