मंडणगड प्रतिनिधी : ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत जल जीवन मिशनच्या माध्यमातून ग्रामपंचायत उमरोली येथील महसूल गाव गवलवाडी, येथे २४ सप्टेंबर २०२६ रोजी पंचायत समिती मंडणगड यांच्यावतीने जल अर्पण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जल जीवन मिशन अंतर्गत गावात निर्माण करण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनांचे ग्रामपंचायत तसेच ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समितीकडे हस्तांतरण करून गाव स्वतःच्या पाण्याचा मालक व्हावे, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात जल यात्रा, जल दिंडी, जलपूजा, जल बंधन तसेच पाणी टाकी व नळांची आकर्षक सजावट करून ‘जल शृंगार’ करण्यात आला. तसेच FTK (Field Test Kit) द्वारे पाणी गुणवत्ता तपासणीचे प्रात्यक्षिक ग्रामस्थांना देण्यात आली. यावेळी उपस्थितांनी जलसंवर्धन व पाणी बचतीची जल शपथ घेतली. या कार्यक्रमास पंचायत समितीच्या सभापती प्रणाली चिले, उपसभापती दीपक मालुसरे, पंचायत समिती सदस्य अनिल रटाटे, दिप्ती घडशी, गटविकास अधिकारी राजेंद्र आंधळे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या उपअभियंता कविता जवादे, शाखा अभियंता विशाल कदम, जिल्हा जलसंधारण अधिकारी मयुरेश भवारी, माजी सरपंच सौ. बोबले, पाणी व स्वच्छता विभागाचे जितेंद्र साळवी यांच्यासह गवलवाडी ग्रामस्थ मंडळ व महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावाच्या पाणीपुरवठा व्यवस्थेची जबाबदारी ग्रामस्थांनी स्वीकारून पाणी बचत, पाणी गुणवत्ता आणि जलस्रोतांचे संवर्धन करण्याचा संकल्प यावेळी करण्यात












