गौरव पोंक्षे माखजन :
संगमेश्वर तालुक्यातील माखजन इंग्लिश स्कूल माखजन येथे शासकीय रेखा परीक्षा २०२६ अंतर्गत इलिमेंटरी आणि इंटरमिजीएट परीक्षा सुरु आहे.इलिमेंटरी परिक्षेला १५६ विद्यार्थी तर इंटरमिजीएट परीक्षेला ११० विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते.
या परीक्षेला माखजन इंग्लिश स्कूल माखजन,श्री देव केदारनाथ विद्या मंदिर आरवली,माध्यमिक विद्यालय करजुवे,दाउल मदरसा इंग्लिश मिडीयम स्कूल सहभागी झाले होते.
माखजन इंग्लिश स्कूल मध्ये अशोक काशिनाथ पोंक्षे कलादालन असल्याने प्रशालेतील व परिसरातील विद्यार्थ्यांना चित्रकला व अन्य तत्सम परीक्षाना सामोरे जाणे सोपे जात आहे.विद्यार्थ्यांना देखील चित्रकलेच्या विविध प्रकारात विशेष रुची निर्माण होत आहे.
दरम्यान इलिमेंटरी आणि इंटरमिजीएट परीक्षकांचे केंद्र प्रमुख म्हणून श्री अमोल पाटील यांनी काम पाहिले.यावेळी मुख्याध्यापक महादेव परब,पर्यवेक्षक अंबादास घाडगे, गणेश शिंदे,ओंकार नामजोशी आदी उपस्थित होते.












