नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत भात शेतीचे तातडीने सरसकट पंचनामे करण्याचे प्रशासनास निर्देश
चौके l प्रतिनिधी :- शेतकऱ्यांनी मोठया कष्टाने आर्थिक भार सोसत अंगमेहनीतेने केलेली शेती वातावरणातील बदलामुळे आणि शेतीला मुबलक पाऊस न पडल्याने तीव्र उन्हात भात शेतीचे करपून मोठे नुकसान होत आहे.भात तयार होण्याच्या अगोदरच केलेली शेती डोळ्यादेखत करपून जात असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
मंगळवारी दुपारी आमदार निलेश राणे यांनी चौके परिसरातील भात शेतीची प्रत्यक्ष पहाणी करत आहे शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत प्रशासनातील अधिकाऱ्यांसमोरच तातडीने सरसकट नुकसानग्रस्त भात शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश देत शेतकऱ्यांना लवकरात लवकर भात शेतीची नुकसान भरपाई मिळवून देण्याचे सांगितले.
यावेळी मालवण तहसीलदार गणेश लव्हे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, पंचायत समिती गटविकास अधिकारी जाधव, आंबेरी मंडल अधिकारी, अलकुटे, चौके तलाठी पी.जी.गुरव,जिल्हा परिषद सदस्या सौ.अक्षता गावडे, मालवण सभापती सौ.प्रज्ञा चव्हाण उप सभापती श्याम झाड उपसभापती, शिवसेना तालुका प्रमुख मंदार लुडबे, माजी सरपंच राजन गावडे,कृषी अधिकारी धनंजय गावडे,कृषी सहाय्यक स्नेहा खोत, चौके सरपंच शिवप्रसाद चौकेकर, नांदरुख सरपंच गोविंद चव्हाण,आंबेरी सरपंच मनमोहन डिचोलकर चौके ग्राम अधिकारी युवराज चव्हाण, चौके येथील भात शेती नुकसानग्रस्त शेतकरी गणू गावडे,गंगाराम गावडे,हरी चव्हाण,आबा गावडे,राघो गावडे,सुभाष चौककर,मोहन गावडे,भाई गावडे आधी शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते.











