सावंतवाडी:गणेशोत्सवातील अंगारकी संकष्टी चतुर्थीचे औचित्य साधून सावंतवाडी शहरातील उभाबाजार हनुमान मित्र मंडळ आणि वैश्यवाडा येथील श्री हनुमान मंदिरात सहस्र मोदक सोहळा व सामुदायिक अथर्वशीर्ष पठण कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि भाविकांच्या उत्स्फूर्त प्रवाहात पार पडला. मंगळवारी दोन्ही ठिकाणच्या गणरायाची षोडशोपचार पूजा-अर्चा संपन्न झाली.
उभाबाजार येथील मंदिरातील पूजेचा मान सलील वंजारी यांना सपत्नीक देण्यात आला. पूजा आणि सामुदायिक अथर्वशीर्ष पठणानंतर आरती करून श्रींना सहस्र मोदकांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. तर वैश्यवाडा येथील श्री हनुमान मंदिरात २१ दिवसांच्या गणेशोत्सवांतर्गत श्री. दिक्षित भटजी यांच्या मार्गदर्शनाखाली सामुदायिक अथर्वशीर्ष पठण पार पडले. येथील पूजेचे मानकरी गुरुनाथ मठकर हे होते. दुपारी महाआरती झाल्यानंतर वैश्यवाडा येथे ‘श्रीं’ना तब्बल ६११२ मोदकांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला.
या सोहळ्यास मंडळाचे अध्यक्ष रघुनाथ कोरगावकर, बाळू कासार, भरत पडते, किशोर कारेकर, काशिनाथ कोरगावकर, राजेश कारेकर, सदानंद तेडले, विलास वाळके, काशिनाथ दुभाषी, अरूण भिसे, कपिल कोरगावकर, प्रशांत वाळके, तुषार कोरगावकर, कुंदन टोपले, गुरू मठकर, बाळ चोडणकर, ओंकार मसुरकर, संजू शिरोडकर, शेखर धारगळकर, विकी कारेकर, गौरव कारेकर, संकल्प धारगळकर, कमलेश पोकळे, ओंकार मळीक, रूतिक कोरगावकर आणि यशश्री कोरगावकर यांच्यासह शर्वरी धारगळकर, कृत्तिका कोरगावकर, ॲड. सायली दुभाषी, सपना चोडणकर आदी मान्यवर व महिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.











