सुमारे 50 लाख निधीतून काम मंजूर
नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या हस्ते भूमिपूजन
स्थानिक नागरिकांनी मानले आमदार निलेश राणे यांचे आभार
मालवण | प्रतिनिधी : चिवला बीच येथे पर्यटक आणि नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या चिवला बीच निलरत्न बंगला ते कुरण पर्यत अस्तित्वातील रस्ता दुरुस्त करणे या कामाचा भूमिपूजन सोहळा आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.
सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान जिल्हास्तर 2025-26 अंतर्गत सुमारे 50 लाख निधीतून हे काम मंजूर करण्यात आले. असे सांगत नगराध्यक्षा ममता वराडकर तसेच स्थानिक नागरिक यांनी आमदार निलेश राणे यांसह खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार मानले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दिपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, जिप वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकार, व्यापारी संघ अध्यक्ष उमेश नेरुरकर, नगरसेविका शर्वरी पाटकर, अश्विनी कांदळकर, दर्शना कासवकर, नगरसेवक महेश कांदळगांवकर, सिद्धार्थ जाधव, ललित चव्हाण शिवसेना पदाधिकारी मंदार लुडबे, बबन शिंदे, विश्वास गांवकर, किसन मांजरेकर, मोहन वराडकर, जॉन नरोना, परशुराम पाटकर, निकीत वराडकर, प्रसन्न मयेकर यांसह स्थानिक नागरिक तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
पथदीप बसवले जाणार
चिवला बीच येथे संपूर्ण मार्गांवर असलेले आकर्षक पथदीप अनेक ठिकाणी बंद आहेत. हे पथदीप बसवून परिसर झळाळून निघणार आहे. यासाठी जिल्हा वार्षिक योजना महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान जिल्हास्तर 2025-26 अंतर्गत सुमारे 10 लाख निधी आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मंजूर झाला असल्याचे नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी सांगितले.
आमदार निलेश राणे यांचे नागरिकांनी मानले आभार
चिवला बीच येथे पर्यटक आणि नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण असलेला हा रस्ता नादुरुस्त झाला होता. आमदार निलेश राणे यांनी प्राधान्यक्रमाने हे काम मंजूर करून निधी उपलब्ध करून घेतला. याबाबत आमदार निलेश राणे, नगराध्यक्षा यांचे स्थानिक नागरिक पर्यटन व्यावसायिक यांच्या वतीने प्रसन्न मयेकर यांनी आभार मानले.
बंधारा भूमिपूजन आठवणीना उजाळा
चिवला बीच येथील पर्यटन वाढीत महत्वाची भूमिका बजावणारा येथील बंधारा माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे साहेब यांनी 2012 साली मंजूर केला. त्यावेळी भूमिपूजन सोहळ्यात नगरसेविका ममता वराडकर यांनी श्रीफळ वाढवले. आता येथील रस्ता दुरुस्ती कामाचे भूमिपूजन होतं असताना आमदार निलेश राणे यांनी श्रीफळ वाढवण्याचा मान नगराध्यक्षा ममता वराडकर यांना दिला. या निमित्ताने बंधारा भूमिपूजन आठवणीना उजाळा मिळाला.










