नर्सरीत काम करत असताना कामगारावर मधमाशांचा हल्ला

काजिरभाटी रत्नागिरी येथील घटना

रत्नागिरी ः प्रतिनिधी
काजिरघाटी येथील नर्सरीमध्ये काम करणाऱ्या कामगाराला मधमाशा चावल्या. जखमी अवस्थेत उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे.
महेश तेजू चव्हाण (२९, रा. काजिरघाटी-नर्सरी जवळ, रत्नागिरी) असे जखमी तरुण कामगाराचे नाव आहे. महेश चव्हाण हा रविवारी सकाळी 11 वा. सुमारास नर्सरीमध्ये काम करत असताना अचानक मधमाशांनी हल्ला चढवला. त्यात तो जखमी झाल्याने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी जिल्हा रुग्णालयाच्या पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.