सावंतवाडी नगरपरिषदेतर्फे महिला व मुलींसाठी विविध प्रशिक्षण उपक्रम

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण समितीतर्फे शहरातील महिला आणि मुलींसाठी विविध कौशल्याधारित प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात येणार आहेत. महिलांना रोजगाराच्या आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, तसेच त्यांचे कौशल्यविकास व्हावा, या उद्देशाने या प्रशिक्षणांचे आयोजन करण्यात आले आहे.

 

या उपक्रमांतर्गत संगणकाचे एम.एस.सी.आय.टी. प्रशिक्षण, फोर व्हीलर व टू व्हीलर वाहन प्रशिक्षण, अॅडव्हान्स फॅशन डिझाईन, कॅटरिंग, कराटे आदी विविध प्रशिक्षणांचा समावेश आहे. शहरातील महिला व मुलींना या प्रशिक्षणाचा लाभ घेता येणार आहे.

 

या प्रशिक्षण उपक्रमाचा उद्घाटन समारंभ २८ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता सावंतवाडी नगरपरिषदेच्या बॅ. नाथ पै सभागृहात आयोजित करण्यात आला होता. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. दीपाली दिलीप भालेकर यांनी या उपक्रमाची माहिती दिली असून, महिला व मुलींनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.