राज्यातील नामांकित ११ भजन मंडळांचा आहे सहभाग..
वेंगुर्ले : प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी (तुळस) आणि आर.सी. ग्रुप (तुळस) यांच्या संयुक्त विद्यमाने भाजप प्रदेशाध्यक्ष श्री. रविंद्रजी चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सलग दुसऱ्या वर्षी राज्यस्तरीय भव्य निमंत्रित संगीत भजन स्पर्धा ‘प्रदेशाध्यक्ष चषक २०२६’ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा शुक्रवार, २ ऑक्टोबर आणि शनिवार, ३ ऑक्टोबर २०२६ रोजी तुळस येथील श्री देव जैतिराश्रित संस्थेचे संस्थापक कर्मयोगी कै. रामचंद्र य. तुळसकर सभागृह, श्री शिवाजी हायस्कूल येथे रंगणार आहे.
या राज्यस्तरीय स्पर्धेत मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ५ जिल्ह्यांतील नामवंत निमंत्रित भजन मंडळे सहभागी होणार असून पारंपरिक भजन संस्कृतीचा जागर करणार आहेत.
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवार, २ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता: नामांकित कलाकारांची भव्य जुगलबंदी कार्यक्रम होणार आहे. तर सायंकाळी ६.३० वाजता मान्यवरांच्या शुभहस्ते या स्पर्धेचे भव्य उद्घाटन संपन्न होणार आहे.
*पहिल्या दिवशी स्पर्धेत होणार पाच भजन मंडळाचे सादरीकरण*
पहिल्या दिवशी स्पर्धेत होणार पाच भजन मंडळाचे सादरीकरण. यामध्ये श्री. विश्वकर्मा प्रासादिक भजन मंडळ गठिवडे, मालवण (बुवा: कु. अक्षय परुळेकर) – सायं. ७ ते ७.४५, श्री ठिकाणदार देव प्रासादिक भजन मंडळ, देवगड (बुवा: कु. हर्ष राणे) – सायं. ८ ते ८.४५, सद्गुरू प्रासादिक भजन मंडळ अणासुर, वेंगुर्ला (बुवा: कु. कौस्तुभ धुरी) – सायं. ९ ते ९.४५, श्री. देव रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ पिंगुळी, कुडाळ (बुवा: श्री. रूपेश येमकर) – सायं. १० ते १०.४५ आणि शेवटी श्री. मेजारेश्वर प्रासादिक भजन मंडळ नागवे, कणकवली (बुवा: श्री. अमेय आर्डेकर) – रात्री ११ ते ११.४५ यांचे भजन सादर होणार.
तर शनिवार, ३ ऑक्टोबर रोजी दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६.०० वाजेपासून भजन स्पर्धा सुरू होणार. यामध्ये श्री. सोमजाई देवी प्रासादिक भजन मंडळ, (रायगड) – बुवा: कु. भावेश शितकर (सायं. ६ ते ६.४५), विष्णु स्मृती भजन सेवा संघ नांदिवली, (डोंबिवली) – बुवा: श्री. अनंत मुळीक (सायं. ७ ते ७.४५), पंचम निशाद भजन मंडळ दांडेली, सावंतवाडी – बुवा: श्री. बाबु गोडकर (सायं. ८ ते ८.४५), श्री. हनुमान प्रासादिक भजन मंडळ भांडुप, (ठाणे) – बुवा: श्री. अनिकेत वालपकर (सायं. ९ ते ९.४५), ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळ उपके राजापूर, (रत्नागिरी) – बुवा: कु. केदार कदम (रात्री १० ते १०.४५) आणि शेवटचे श्री गांगोरानेश्वर प्रासादिक भजन मंडळ, मालाड (मुंबई) – बुवा: कु. जयेश घाडी (रात्री ११ ते ११.४५) यांचे भजन सादर होणार. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न होणार आहे. या संपूर्ण सोहळ्याचे थेट प्रक्षेपण (LIVE) ‘प्रहार डिजिटल’ या डिजिटल चॅनेलवर पाहायला मिळणार आहे. या भजन महोत्सवाला आणि सुरेल जुगलबंदीचा आस्वाद घेण्यासाठी सर्व भजनप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक भारतीय जनता पार्टी (तुळस) व आर.सी. ग्रुप (तुळस) यांच्या वतीने करण्यात आले आहे.










