माखजन प्रशालेत महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री जयंती

गौरव पोंक्षे माखजन:
संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल माखजन व ॲड.पी आर नामजोशी कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व भारताचे दुसरे माजी पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली.
प्रथम प्रशालेचे मुख्याध्यापक महादेव परब व पर्यवेक्षक अंबादास घाडगे यांनी दोन्ही महात्म्यांना पुष्पहार अर्पण करत संस्था व प्रशालेतर्फे आदरांजली व्यक्त केली.प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक च्या विद्यार्थ्यांनी मराठी व इंग्रजी भाषेत बहारदार मनोगते सादर केली.१२ वी विज्ञान मध्ये शिकत असलेल्या जानवी आलीम हिने ह्या दोन्ही महानुभवांच्या जीवन कार्याचा सविस्तर आढावा घेतला.
प्रा.संजय सूर्यवंशी यांनी आपल्या नेहमीच्या बहारदार शैलीत महात्मा गांधी आणि लाल बहाद्दूर शास्त्री यांनी देशासाठी केलेल्या त्यागाबद्दल आणि असीमित कार्या बद्दल सखोल मार्गदर्शन केले.मुख्याध्यापकांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांनी जयंत्या आणि पुण्यतिथ्या साजऱ्या करण्यामागचा हेतू समजून घ्यावा व त्यांच्या विचारांचा अंश जरी आचरणात आणला तरी आपली उन्नती होईल असा आशावाद व्यक्त केला.या कार्यक्रमाला गट प्रमुख विठ्ठल भोईर,शिक्षक प्रतिनिधी अमोल पाटील,रुही पाटणकर,विशाखा धावडे,मालती लिंगायत,संतोष कुलकर्णी,सुनील दिंडे,हरिश्चंद्र पागडे,सचिन कदम,रवींद्र पवार,जगदीश जाधव,अभिजित सुर्वे,ऋषिकेश लोध आदिंसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरव पोंक्षे यांनी केले.