समुद्री सापाचा दंश; खलाशी रुग्णालयात

रत्नागिरी : प्रतिनिधी
बोटीवर मासेमारी करत असताना समुद्री साप चावलेल्या खलाशाला अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटना ३० सप्टेंबरला सकाळी सहाच्या सुमारास जैतापूर येथे समुद्रात असताना घडली.
संदेश मादू राणजे (४८, रा. कलासरी-वरचापाडा, जि. पालघर) असे समुद्री साप चावलेल्या खलाशाचे नाव आहे. ही संदेश राणजे हा बोटीवर मासेमारी करत असताना त्याला समुद्री सापाने दंश केला. बोटीवरील इतर सहकाऱ्यांनी त्याला तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र जैतापूर येथे दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी जिल्हा रुग्णालयाच्या पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.