सावंतवाडी : सावंतवाडी नगरपािषदेचे माजी नगरसेवक तथा सालईवाडा सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष राजा स्वार यांचे शुक्रवारी रात्रीच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले.
राजा स्वार यांनी सावंतवाडी नगरपरिषदेत नगरसेवक तसेच पाणीपुरवठा व आरोग्य खात्याचे सभापती म्हणून चांगलं काम केलं होतं. त्यांचा जनसंपर्क दांडगा होता. नगरसेवक म्हणून दोन वेळा ते निवडून आले होते. अगदी सचोटीने नागरीकांची काम ते करत असत. माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या समवेत अनेक वर्ष त्यांनी काम केलं होतं. त्यानंतर माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान आमदार माजी मंत्री दीपक केसरकर यांच्याही सोबत त्यांनी काम केलं. माजी नगराध्यक्ष सौ. पल्लवी केसरकर नगराध्यक्षा असताना राजा स्वार हे सभापती होते.
अत्यंत मनमिळावू स्वभावाचा राजा आज आम्ही गमावलाय त्याचे दुःख आहे, दिलदार व्यक्तिमत्त्वाचा राजा आज आपयातून निघून गेला त्यांना श्रद्धांजली वाहत असताना वेदना होत आहेत. राजाभाऊ यांच्या आत्म्यास चिरशांती मिळो त्यांच्या कुटुंबीयांना दुःख पचण्यासाठी ईश्वर बळ देवो, अशा शब्दांत त्यांचे सहकारी तथा माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आदरांजली अर्पण केली.
राजा स्वार हे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रात सक्रिय होते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सालईवाडाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी बराच काळ कारभार सांभाळला. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.













