महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते गौरव
लांजा ( प्रतिनिधी): अगदी लहान वयातच जलतरण स्पर्धा गाजवणारा लांजा तालुक्यातील आरगाव चा सुपुत्र , बाल जलतरणपटू रेयांश खामकर याचा गुरुवारी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने खास गौरव करण्यात आला.
ठाणे महानगरपालिकेचा वर्धापन दिन एक ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा तसेच विद्यार्थ्यांचा ठाणे गुनिजन, ठाणे गौरव, ठाणे भूषण विशेष क्रीडा विशेष, कला पुरस्काराने सन्मानित करण्यात आला. यावर्षीच्या विशेष क्रीडा पुरस्कारासाठी लांजा तालुक्यातील आरगाव चा सुपुत्र असलेल्या रेयांश खामकर याची निवड करण्यात आली होती. रेयांश खामकर याने अगदी सात वर्षापासून जलतरण स्पर्धा या गाजवली आहेत. त्यामुळे त्याने आजवर विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील जलतरण स्पर्धेत उज्वल यश संपादन केले आहे.थायलंड येथे झालेल्या एशियन ओपन स्कूल स्विमिंग चॅम्पियनशिप बँकॉक या स्पर्धेत चार सिल्वर आणि एक ब्रांझ अशा एकूण पाच पदकांची कमाई करत लांजा तालुक्याचेच नव्हे तर संपूर्ण भारत देशाचे नाव रोशन केले आहे.
जलतरण मधील असलेल्या त्याच्या चमकदार कामगिरीची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने देखील यापूर्वीच नोंद घेतलेली आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देखील रेयांश खामकर याचा सत्कार करण्यात आला होता.
दरम्यान, महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते रेयांश खामकर याचा विशेष क्रीडा पुरस्काराने गौरव करण्यात आला. यावेळी ठाणे महानगरपालिकेच्या खासदार नरेश म्हस्के तसेच आमदार रवींद्र फाटक आणि महापौर कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते.













