रत्नागिरी:
गुरुवार दिनांक १ ऑक्टोबर २०२६ ला रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन सभासदांच्या मोठ्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. या प्रसंगी वयाची ७५, ८०, ८५, ९० व ९५ वर्षे पूर्ण झालेल्या सभासदांचा तसेच वैवाहिक सहजीवनाची ५० वर्षे पूर्ण झालेल्या सभासद दाम्पत्यांचा संघातर्फे शाल व सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला.
लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी ने या कार्यक्रमात सहभागी होऊन ज्येष्ठांप्रती आदर व्यक्त केला. लायन्स क्लबच्या वतीने अध्यक्ष सुमित ओसवाल, खजिनदार हरचेकर व माजी अध्यक्षi ॲड शबाना वस्ता उपस्थित होत्या. या कार्यक्रमाला श्रीमती वैदेही रानडे मुख्य कार्यकारी अधिकारी रत्नागिरी जिल्हा परिषद प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार होत्या परंतु मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या तातडीच्या व्हॉईस कॉन्फरन्स मुळे त्या उपस्थित राहू शकल्या नाहीत. त्यांच्या वतीने श्री उत्तम सुर्वे मुख्य लेखा व वित्त अधिकारी उपस्थित होते. त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे भाग्य लाभल्याबद्दल संघाचे आभार मानले आणि सर्व उपस्थित ज्येष्ठाबाबत आदरभाव व्यक्त केला.
कार्यक्रम यशस्वी पार पडण्यास संघाच्या पदाधिकारी व सभासदानी चांगले सहकार्य केले.
पसायदाना नंतर अल्पोपहार होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.













