खेड (प्रतिनिधी) : खेड लायन्स एज्युकेशन सोसायटी संचलित एल.टी.टी. इंग्लिश मिडिअम स्कूल व ज्युनिअर कॉलेज, खेड येथे शुक्रवार, दि. २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी समन्वयक जॉय सर व मुख्याध्यापक जी. बी. सारंग सर यांच्या हस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी दोन्ही महान नेत्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमास समन्वयिका एल्सी मॅडम, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका पी. एस. कुडाळकर मॅडम, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी भाषणातून महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. कु. आश्विक पवार, कु. अहमद तिसेकर, कु. शावेझ सुर्वे, कु. अझलान वालापकर, कु. हसनेन पेडेकर, कु. दानिश शेख, कु. वेदा म्हाप्रळकर, कु. सारा गुजर, कु. अहना नाडकर, कु. अली बडे, रुद्र कदम, कु. कमलेश रायका, कु. अन्वी कांबळे, कु. श्रावणी पवार, कु. श्रेया पेवेकर, कु. स्वरा चव्हाण, कु. स्वरा जाधव, कु. साजिदा हमदुले, कु. अमल जसनाईक, कु. शार्दुल माने, कु. विश्वा जैन, कु. स्वरा शेठ व कु. मीरा गुडेकर यांनी आपल्या भाषणातून महात्मा गांधीजींचे जीवनचरित्र व विचार मांडले.
संस्थाध्यक्ष अहमदभाई मुकादम, परवेज मुकादम, प्रेमळ चिखले, जयेश गुहागरकर, चंद्रकिरण वैद्य, माजिद खतीब, विलीन पाटणे व पुष्कर नेने यांनी उपस्थितांना जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन आफरीन कौचाली मॅडम यांनी केले, तर कार्यक्रमाचे नियोजन सायली कांबळे मॅडम यांनी केले. त्यांच्या नियोजनातून कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.













